जागर बाल हक्क व सुरक्षितता
*जागर बाल हक्क व सुरक्षिततेचा*.......
*बालकांचे हक्क व सुरक्षितता राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण*
*आयोजक :-* समता विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
*उदघाटन व मार्गदर्शन*
*मा. श्री. दिनकर पाटील,*
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
✒️आज दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी समता विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील जिल्हास्तरीय सुलभकांसाठी बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
*दिवस : पहिला*
*दिनांक : 23 सप्टेंबर 2020*
🌈 *या राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाची सुरुवात मा. श्री. दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनाने झाली.* मा.संचालक महोदय यांनी - विद्यमान परिस्थितीत माहिती तंत्रज्ञानाच्या साधनाद्वारे आपण भेटत आहोत, समाज माध्यमातून प्रत्येक व्यक्ती जगाशी जोडला गेला आहे, प्रत्येक शिक्षक व्हाट्सअप,झूम ऍप, गुगल मिट याद्वारे विद्यार्थ्यांना भेटत आहे,त्यातून त्यांचे शिक्षण सुरू आहे, भविष्यात देखील आपण याच पद्धतीने ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे, गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण देणे सुरू आहे, समाज माध्यमाचा सुसंगत वापर करणे, जर या समाज माध्यमाचा विपरीत परिणाम होत असेल तर समाजाला सजग करणे आपले कर्तव्य आहे, या समाज माध्यमाची उपयुक्तता व काही मर्यादा देखील आहेत, आरटीई नुसार मूल शाळेत आल्यानंतर शाळेत मुलांची सुरक्षितता मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे, समाज माध्यम वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, बालकांची सुरक्षा हे कुटुंब, समाज व शाळा यांची सामायिक जबाबदारी आहे, बालकांचे हक्क त्यावर आधारित कायदे, त्यासाठीच्या शासकीय यंत्रणा,बालकांच्या हक्का प्रति संवेदनशीलता, सर्व प्रकारच्या शोषणाला प्रतिकार व सुरक्षिततेची हमी देणे ही भावनिक,मानसिक व संवेदनशील जबाबदारी आपली आहे, सायबर क्राईम याबाबतची सजगता असली पाहिजे. शासनमान्य प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाला हे प्रशिक्षण दिले जात असून या शिक्षकांनी शाळेतील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करावयाचे आहे, केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील इतर शिक्षकांना याचे प्रशिक्षण द्यावयाचे आहे अशय विस्तृत मार्गदर्शन केले.
👉 *श्रीम. कमलादेवी आवटे, उपसंचालक, समता विभाग* यांनी या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक करताना ऑनलाइन प्रशिक्षणाचे स्वरूप, प्रशिक्षण कोणासाठी, प्रशिक्षणाची मार्गदर्शक पुस्तिका, मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बाल हक्क व सुरक्षिततेचे गरज, संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेली बाल अधिकार संहिता, विद्यमान परिस्थितीत समाज माध्यमाचा वाढलेला वापर व त्यातून निर्माण झालेल्या समस्या, शाळेत बालस्नेही वातावरण कसे निर्माण करता येतील या बाबत प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.
✒️ *श्रीमती रत्नप्रभा भालेराव, ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट, नाशिक* यांनी प्रथम सत्रात *प्रशिक्षणाची पार्श्वभूमी* विशद करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बालकांच्या मानसिक व शारीरिक सुरक्षिततेचा विचार करावा लागतो, संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेली संहिता म्हणजे बालकांच्या सुरक्षिततेचा दस्तऐवज होय, बालकांचे हक्क संवर्धन - संरक्षण करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून संहितेतील तीन आधारभूत तत्त्वे,बालकांचे चार प्रमुख हक्क, हक्कांबाबत अधिक संवेदनशीलतेची गरज का आहे, प्रशिक्षणातून आपणास काय समजेल इत्यादी मुद्द्यांना पीपीटी द्वारे सुलभिकीकरण केले.
✒️ *श्री विकास सावंत, युनिसेफ यांनी बालकांच्या संरक्षणासाठीचे कायदे व यंत्रणा* या विषयावर - हा घटक का महत्त्वाचा आहे, बालकांच्या संरक्षणासाठीचे कायदे - 1) J. J. Act 2015 ; 2) PCSO Act 2012 ; 3) ITPA 1956 ; 4) CMPA 2006 ; 5) CLPRA 2016 ; 6) IT Act 2008 ; 7) RTE Act 2009 इत्यादी कायद्यानंविषयी माहिती देऊन बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ, शासकीय यंत्रणेसोबत समन्वय, बालकांचे नाव जाहीर होऊ नये याकरिता घ्यावयाची दक्षता इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
✒️ *श्रीम.सोनाली परब व श्रीम. शुभांगी शिंदे, अर्पण संस्था* यांनी *बाल लैंगिक शोषण* या घटकावर सुलभिकीकरण करताना - बाल शोषण हे अपघाती नसून हेतुपूर्वक असते, लैंगिक शोषणाचे प्रकार, बाल शोषण होण्याची अधिक शक्यता असलेली मुले कोणती, ग्रुमिंग, मुलांवर होणारा परिणाम, लैंगिक शोषणाचे काही लक्षणे, मुले मोठे होताना त्यांच्यावर या गोष्टींचा काय परिणाम होतो, *वैयक्तिक सुरक्षा शिक्षण अर्पण संस्थेचा कार्यक्रम* एक जीवन कौशल्य मॉड्यूल आहे, वयानुसार योग्य संदेश - No (नाही म्हणा ), Go (तेथून जा )आणि Tell (विश्वासू व्यक्तीला सांगा), प्रभावीपणे प्रकटीकरण हाताळणे, आपण कसे हाताळले पाहिजे, काय करू नये, शिक्षकांना शोषणाबाबत संशय असेल तर आणि संस्थात्मक प्रोटोकॉल इत्यादी बाबत विस्तृत माहिती दिली.
*सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन*
*डॉ दत्तात्रय मेंढेकर,ज्येष्ठ अधिव्याख्याता, विभाग प्रमुख* यांनी सदर ऑनलाईन प्रशिक्षणाचे समन्वय, सूत्रसंचालन तसेच सर्वांचे आभार प्रदर्शन केले.
*या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद देतील अधिकारी तसेच डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक,ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती इत्यादी उपस्थित होते.*
*✒️ वृत्तांकन*
अभय परिहार,
अधिव्याख्याता, डायट, नांदेड.
Comments
Post a Comment